spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर विभाग ठरला सर्वोत्तम

– महाआवास अभियानात नागपूर विभागाला 10 राज्यस्तरीय पुरस्कार

– केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पुरस्कार वितरण

नागपूर :- महाआवास अभियान वर्ष 2023-24 अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट तीन विभागामध्ये नागपूर विभागाने प्रथम स्थान पटकाविले असून विविध श्रेणीमध्ये विभागातील जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना प्रधानमंत्री आवास योजना (पीएम आवास) ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेतील उत्कृष्ट कार्यासाठी एकूण 10 राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. सातारा येथे 15 मे 2026 रोजी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकूण सहा श्रेणींमध्ये 34 पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये 10 पुरस्कार नागपूर विभागाला वितरित होणार आहेत.

विभागांच्या श्रेणीमध्ये नागपूर अव्वल

राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्वोत्कृष्ट तीन विभाग निवडण्यात आले असून नागपूर विभाग प्रथम स्थानावर आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट विभागाच्या श्रेणीमध्ये नागपूर विभागाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

पीएम आवास-ग्रामीणच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम

जिल्ह्यांच्या श्रेणीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंमलबजावणीसाठी सर्वोत्कृष्ट तीन जिल्हे निवडण्यात आले असून गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट जिल्ह्यांच्या श्रेणीमध्ये वर्धा जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

तालुक्यांचीही सरसी  

राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट तालुक्यांच्या श्रेणीमध्ये वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर तालुक्यांच्या श्रेणीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंमलबजावणीसाठी सर्वोत्कृष्ट तीन तालुके निवडण्यात आले असून नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्याने तिसरे स्थान मिळविले आहे.

आजनसरा ग्रामपंचायत राज्यात प्रथम

राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंमलबजावणीसाठी निवडण्यात आलेल्या राज्यातील सर्वोत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळविला आहे.

सर्वोत्कृष्ट गृहसंकुल पुरस्कारावर ससेगाव ग्रामपंचातीची नाममुद्रा

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कष्ट गृहसंकुल श्रेणीमध्ये नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील ससेगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारावर आपली नाममुद्रा उमटविली आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत श्रेणीमध्ये वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील वर्धामनेरी ग्रामपंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.