Related Posts

नागपूरची वंशिका दोडके ‘खेलो इंडिया अस्मिता U-15 रग्बी लीग’ (पश्चिम विभाग) अजमेर येथे महाराष्ट्र संघाच करणार प्रतिनिधित्व

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>रग्बी असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे अत्यंत अभिमानाने जाहीर करण्यात येते की&comma; नागपूर जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडू वंशिका सुरेखा धर्मराज दोडके हिची निवड खेलो इंडिया अस्मिता U-15 रग्बी लीग &lpar;पश्चिम विभाग&rpar; या स्पर्धेसाठी झाली आहे&period; ही स्पर्धा १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी अजमेर &lpar;राजस्थान&rpar; येथे पार पडणार असून रग्बी असोसिएशन ऑफ नागपूरसाठी हा अभिमानाचा क्षण आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने ६ ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत बार्न्स स्कूल आणि ज्युनियर कॉलेज&comma; देवळाली &lpar;नाशिक&rpar; येथे &OpenCurlyQuote;महा कॅम्प व निवड चाचण्या’ आयोजित करण्यात आल्या होत्या&period; या निवड चाचणीत संपूर्ण महाराष्ट्रातून U-15 वयोगटात सुमारे ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला&comma; त्यापैकी कठोर निवड प्रक्रियेनंतर १२ खेळाडूंचा महाराष्ट्र संघ निश्चित करण्यात आला&comma; ज्यामध्ये वंशिकाने उल्लेखनीय कामगिरी करत आपले स्थान निश्चित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>वंशिकाने यापूर्वी U-14 स्कूल नॅशनल रग्बी चॅम्पियनशिप २०२४ मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून कांस्यपदक &lpar;Bronze Medal&rpar; जिंकले होते&period; सातत्यपूर्ण सराव&comma; जिद्द व खेळातील परिपक्वतेच्या जोरावर ती राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर सातत्याने पुढे सरकत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>वंशिका नागपूर जिल्ह्यातील आदिवासी भागातून आलेली असून तिचे कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत आहे&period; वडील शेतकरी असून माता मजुर म्हणून काम करतात&period; प्रतिकूल परिस्थितीतही तिने दाखवलेली चिकाटी&comma; समर्पण आणि प्रगती आज अनेक मुलींना प्रेरणा देत आहे&period; तिच्या यशामुळे नागपूर व आदिवासी समाजातील बालिकांना क्रीडाक्षेत्रात पुढे येण्यासाठी नवी ऊर्जा मिळत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अमर भंडारवार&comma; प्रशिक्षक व सचिव&comma; रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर आणि अनेक महराष्ट्रातील वरिष्ठ प्रशिक्षक यांच्या मते&comma; &OpenCurlyDoubleQuote;वंशिका सातत्य आणि कठोर परिश्रम कायम ठेवत राहिली&comma; तर आगामी येत्या काही वर्षांत ती भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत करण्याची क्षमता बाळगते&period; तिची कामगिरी प्रभावी असून मनापासून अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा&period;”<&sol;p>&NewLine;<p>रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर&comma; युवा खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या रचनात्मक प्रयत्नाबद्दल रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचे आभार मानते&period; त्यांच्या नियोजन व प्रशिक्षणामुळे राज्यातील खेळाडूंना मोठ्या पातळीवर चमकण्याचा मार्ग निर्माण झाला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>संघटनेचे सर्व सदस्य&comma; प्रशिक्षक&comma; खेळाडू आणि रग्बी असोसिएशन ऑफ नागपूरशी संबंधित सर्वजण वंशिकाच्या यशाबद्दल अतिशय अभिमान बाळगून तिला अजमेरमधील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत&period;<&sol;p>&NewLine;