

गडचिरोली :- राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान (अन्नधान्य पिके) व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान सन २०२५-२६ रब्बी हंगाम अंतर्गत पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारत घेता सुधारित/ संकरीत बियाणे वाणाचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पिक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत असावा. सर्व बाबीचा लाभ घेण्यासाठी लाभधारकाने अग्रीस्टाक व नोंदणी करून फार्मर आयडी काढलेले असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान (कडधान्य) योजनेअंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण हरभरा या पीकासाठी अनुदान दर हा 10 वर्ष आतील 50 टक्के किंवा रु.5000/- प्रति क्विंटल यापैकी किमान प्रमाणे अनुदान किंवा 10 वर्षावरील 50 टक्के किंवा रु. 2500/-प्रति क्वीं.याप्रमाणे किमान प्रमाणे अनुदान राहील. याकरीता निकष पुढील प्रमाणे असेल 7/12 उताराच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्वावर लाभ देण्यात येईल. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची आवश्यकता नसून महाबीज डिलर मार्फत बियाणे वितरीत करण्यात येईल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान पिक प्रात्याक्षिक अंतर्गत हरभरा व रब्बी ज्वारी करीता 100 टक्के अनुदान. व त्याकरीता निकष पुढीलप्रमाणे आहेत- शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था ई. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्वावर लाभ देण्यात येईल.
तसेच राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत करडई करीता 100 टक्के अनुदान. निकष पुढील प्रमाणे आहेत- शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था ई. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्वावर लाभ देण्यात येईल.
तरी वरील पिक प्रात्याक्षिक या बाबीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी/ शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्था यांनी (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin) या वेबसाईट वर दिनांक २६ सप्टेंबर २०२५ अंतिम मुदत असून विहित मुदतीत अर्ज करावे. व अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली श्रीमती प्रीती म. हिरळकर यांनी केलेले आहे.
निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत- पिक प्रात्यक्षिक ही बाब MAHADBT पोर्टल द्वारे नोंदणीकृत शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था ई. द्वारे राबविण्यात येत असून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर निवड करण्यात येईल. शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी केलेला असावा. शेतकरी गट कोणत्याही शासन मान्यता प्राप्त यंत्रने कडे नोंदणीकृत असावा. गटातील शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी अग्रीस्टाक वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. एका कुटुंबातील (पती, पत्नी व १० वर्ष खालील अपत्य) एकाच व्यक्तीला लाभ देण्यात येईल. प्रमाणित बियाणे वितरण घटका अंतर्गत (हरभरा) आर्थिक सहाय्य वैयक्तिक लाभ प्रती शेतकरी किमान ०.२० हे.ते कमाल १ हे. मर्यादित आहे. शेतकऱ्यास संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरका मार्फत ७/१२ उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर सदर घटकाचा लाभ देण्यात येईल. (FCFS) या तत्वावर सदर घटकाचा लाभ देण्यात येईल.



