spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

२२ सप्टेंबर ला दुर्गा माता मंदीर पिपरी-कन्हान येथे नवरात्रोत्सवाचा शुभारंभ

– भव्य कावड यात्रेने नवरात्र महेत्सवाची सुरूवात

कन्हान :- प्राचिन दुर्गा माता मंदीर चौक पिपरी येथे सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी – कन्हान व्दारे भव्य कावड यात्रेसह नवरात्र महोत्सवाची शुभा रंभ करून नव दिवस आरती, भजन, जस आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दरवर्षी प्रमाणे सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी- कन्हान व्दारे प्राचिन दुर्गा माता मंदीर चौक पिपरी येथे पारंपरिक संस्कृती प्रमाणे सोमवार (दि.२२) सप्टेंबर २०२५ ला सकाळी ८ वाजता पावन कन्हान नदी पात्रात नदी व कलशाची पुजा अर्चना करून १०८ कलशात जल भरून बीकेसीपी शाळे पासुन महामार्गाने कलश धारी कन्या व महिला आणि कावडधारी पुरूषा सह नवदुर्गे चे नव रूप प्रतिमा, हवन कुंडच्या रथ, भजन, जस मंडळ, डि जे, बँड वाज वित “दुर्गे मातेचा जय जयकार करून नाचत भव्य कावड यात्रा काढुन महामार्गाने नगरपरिषद सामोरून आंबेडकर चौक, पुढे पिपरी मार्गाने दुर्गा माता मंदीरात पोहचुन मातेचा जलअभिषेक, पुजन व घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ करण्यात येईल. दररोज सकाळ व संध्याकाळ पूजापाठ, महाआरती, भजन, जस, जागरण सह धार्मित कार्यक्रमाचे आयो जन मंगळवार (दि.३०) ला अष्टमी महायज्ञ २१ हवन कुंड पूजन, बुधवार (दि.०१) ऑक्टोबर ला सायंकाळी ६ वाजता पासुन भव्य महाप्रसाद. गुरूवार (दि.२) ऑक्टोबंर ला सकाळी ९ वाजता घट विसर्जन आणि सायंकाळी ७ वाजता रावण दहन करून नवरात्री महो त्सवाची सांगता करण्यात येईल. कन्हान व परिसराती ल भाविक भक्तानी वेळेवर उपस्थित राहुन नवदुर्गा मातेचा आशिर्वाद घेऊन या नवरात्र महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष देवा चतुर हयानी केले आहे. महोत्सवाच्या यशस्वितेकरिता मार्गदर्शक माजी खासदार प्रकाश जाधव, मंडळाचे राधेश्याम भोयर, मनोज कुरडकर, प्रशांत मसार, शालिकराम, ठाकरे, केसरीचंद पटेल, बाला खंगारे, शितल भीमनवार, फजित खंगारे, प्रमोद मोटवानी, अशोक मेश्राम, विशाल येलमुले, विजय खडसे, गंगाधर तिवाडे, सचिन खंगारे, विशाल ढोंमणे, अमोल सुटे, तुषार येलमुले, दुर्गेश फुलझेले, सारंग कुथे, नंदु येलमुले, सुनिल चापले, कृणाल येलमुले, सोनु कुरडकर, कृणाल खडसे, हिमांशु येलमुले, रोशन खंगारे सह समस्थ पिपरी, कन्हान नगरवासी सहकार्य करित आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.