Home Latest News ॐ महाकाली मंदीरात २६ सप्टें. ला नवरात्री घट स्थापना

ॐ महाकाली मंदीरात २६ सप्टें. ला नवरात्री घट स्थापना

0
134

कन्हान :- नागपुर जिल्हयातील पावन कन्हान नदी च्या काठावरील प्रसिध्द ‘क’ तिर्थ क्षेत्र असलेले ॐ महाकाली मंदिर सत्रापुर रोड कन्हान येथे ॐ महाकाली सेवा समिती कन्हान-सत्रापुर व्दारे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शूक्रवार (दि.२६) सप्टेंबर २०२५ ला सकाळी ९ वाजता घट स्थापना करून नवरात्र उत्सवा ची सुरूवात होणार आहे. नव दिवस पुजा, अर्चना, सकाळ, सायंकाळ आरती आणि भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून शनिवार (दि.४) ऑक्टोबंर ला सकाळी ८.३० वाजता कन्हान नदीच्या पावन पात्रात घटविसर्जन करून नवरात्र उत्सव थाटा त साजरा करण्यात येणार आहे. करिता जिल्हयातील सर्व भाविक भक्त मंडळींनी निर्धारित वेळेस उपस्थिती राहुन ॐ महाकाली मातेच्या दर्शनाचा तसेच धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन ॐ महाकाली सेवा समिती कन्हान-सत्रापुर चे सचिव प्रकाश कडु हयानी केले आहे.