spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वडोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक

कामठी :- आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कामठी ग्रामीण तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक वडोदा येथे उत्साहात पार पडली. पदवीधर मतदारांची नोंदणी, पक्ष संघटन बळकटीकरण तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने करावयाच्या नियोजनावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सलिलदादा देशमुख होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुटे, प्रदेश प्रवक्ते अविनाश गोतमारे, प्रदेश युवक सचिव शैलेन्द्र तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कामठी ग्रामीण तालुकाध्यक्ष विशाल गाडबैल यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अर्चना गाडबैल यांचीही उपस्थिती होती.

बैठकीत पदवीधर मतदारसंघासाठी पात्र मतदारांची नोंदणी अधिकाधिक प्रमाणात पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावांत जनजागृती करून पात्र पदवीधरांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच मतदार नोंदणी मोहिमेला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीला किशोर डहाके, बंडू डहाके, संजय पिंपळे, आशिष थोटे, राजेंद्र करडभाजने, सुधाकर ठाकरे, राजू इलमे, अमर रामटेके, कु. वैष्णवी अढाऊ, सौ. सुप्रिया ठाकरे, वनिता जाधव, सपना हंबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles