spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अतिवृष्टी नुकसान मदत वितरणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करावी

– जिल्हा प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ :- जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ६ लक्ष ५५ हजार ४२.८६ हे. आर शेती पिकाचे नुकसान झाले असून ५लक्ष ३० हजार ७३६ शेतकरी बाधित झाले आहे. या करिता शासन स्तरावरून विविध शासन निर्णया नुसार ५५८ कोटी ८२.०९ लक्ष इतका निधी मंजूर झाला आहे. ई – पंचनामा पोर्टलवर आतापर्यंत ४ लक्ष ५१ हजार ५९५ बाधित शेतकरी यांचे याद्या अपलोड झाले असून त्याची टक्केवारी ८५.०९ टक्के आहे व आतापर्यंत ३ लक्ष २६ हजार ८६२ बाधित शेतकरी यांचे खात्यात ३०३ कोटी ५४.३७ लक्ष इतका निधी डीबीटी द्वारे जमा करण्यात आलेला आहे.

तसेच ज्या बाधित शेतक-यांनी तलाठी, कृषी सहायक, मंडळ अधिकारी यांचेकडे चुकीची माहीती सादर करणे जसे आधार कार्ड, गट नंबर, सामाईक क्षेत्र असल्यास ज्या लाभार्थी यांचे खात्यावर रक्कम जमा करावयाचे आहे, त्यांची अॅग्रीस्टॅक मध्ये नोंदणी नसणे, ॲग्रीस्टॅक व आधार मधील नावात तफावत असणे यामुळे जवळपास ४० हजार बाधीत शेतकरी यांचे डिबीटी पेंमेंन्ट फेल होऊन ती यादी तहसिलदार यांचे लॉगीनला उपलब्ध झालेली आहे.

तसेच मयत शेतकरी, वारसांचे संमती पत्र न मिळणे, बाधित शेतकरी यांनी खाते क्रमांक बाबत माहिती तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा न करणे यामुळे संबंधित बाधित शेतकरी यांचे वाटप प्रलंबित आहेत. करिता ज्या शेतक-यांना अद्याप शेतीपीक नुकसानीची मदत प्राप्त झालेली नाही त्यांनी तलाठी / कृषी सहाय्यक चेकडे तात्काळ माहिती द्यावी तसेच ॲग्रीस्टॅक संदर्भात माहीतीमध्ये तफावत असल्यास त्याबाबतची संपुर्ण माहीती तलाठी, कृषी सहायक यांना तात्काळ उपलब्ध करुन दयावे जेणे करुन अर्जातील त्रुटी दुर करुन सनस्तरावरुन तात्काळ डीबीटी व्दारे मदत वितरीत करता येईल असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे.

Popular Articles