spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोंदियातील नेताजी सुभाष गार्डन एका वर्षा नंतर पुन्हा सुरु आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण

गोंदिया :- शहरातील नेताजी सुभाष गार्डन एका नव्या स्वरूपात गोंदिया कारणासाठी पुन्हा सुरु करण्यात आला आहे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते या सुभाष गार्डनचे लोकार्पण करण्यात आले असून या ठिकाणी दर दिवशी फिरायला येणाऱ्या लोकांन करीत नवीन सुविधा ,व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी नवीन आधुनिक उपकरणे या ठिकाणी बसविण्यात आली आहे तर सोबतच मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी माती मिश्रित एक नवा वाकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे तर बच्चे कंपनी करिता देखील या बागेत विविध खेळ सामग्री देखील बसविण्यात आली आहे तर वयोवृद्ध लोकांन करीत बसण्याची वेगळी सुविधा देखील या बागेत करण्यात आली आहे सोबतच बच्चे कंपनीच्या मनोरंजना करिता या सुभाष बागेत ठीक ठिकाणी आर्टिफिशियल जनावरे लावण्यात आली आहे यात मगर ,हिरण ,लॉयन तसेच गोंदिया जिल्याचा वन वैभव समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्याची प्रतिकृती देखील या बागेत तयार करण्यात आली असल्याने मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या लोकांना नवीन सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त केला आहे.

तर गोंदिया शहरातील सुभाष गार्डन हे एक मेव बगीचा असल्याने गोंदिया शहराच्या इतर भागात देखील नगरपरिषदेच्या जागा राखीव असून त्याही ठिकाणी बगीचा निर्माण करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या कडे केली आहे ,तर विशेष बाब म्हणजे हा सुभाष गार्डन नगर परिषदेच्या मालकीचा असून सुद्धा लोकार्पणाच्या वेळी नगर परिषदेचा कुठलाही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर नसल्याने नागरिकांना देखील प्रश्न पडला या संदर्भात गोंदिया नगर परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप बोरकर याना विचारणा केली असता सुभाष गार्डन चे काम अजून १०० % पूर्ण झाले नसल्याने आम्ही कामे पूर्ण झाल्यावर पुन्हा लोकार्पण करू अशी माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप बोरकर यांनी माध्यमांना दिली आहे त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणूक लक्षात घेता घाई घाईत सुभाष गार्डन चा लोकार्पण सोहळा उरखान्यात आला तर नाही ना अशी कुजबुज गोंदिया शहरात सुरु आहे.

Popular Articles