Home Latest News परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

0

<p><strong>मुंबई &colon;- &&num;8216&semi;<&sol;strong>मिशन मौसम’ योजेनेंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार बसविण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मंजूरी दिली असल्याचे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ&period; जितेंद्रसिंह यांनी पत्राद्वारे कळविले आहे&period; यामुळे मराठवाड्यात हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक डॉपलर वेदर रडार बसविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>केंद्रीय राज्यमंत्री डॉ&period; जितेंद्रसिंह यांनी पाठविलेल्या पत्रात पुढे नमूद केले आहे की&comma; सोलापूर येथे आधीपासून कार्यरत असलेला २५० कि&period;मी&period; परिघाचा डॉपलर रडार सध्या परभणी आणि नांदेड परिसरातील हवामान निरीक्षणासाठी वापरला जात आहे&period; तसेच &OpenCurlyQuote;मिशन मौसम’ योजनेंतर्गत परभणी भागात आणखी एक नवीन सी-बँड रडार बसविण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारने मंजूर केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मराठवाडा हा दुष्काळप्रवण प्रदेश असून शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाची अचूक माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक होता&period; केंद्र सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता हवामान अंदाजासाठी आपली क्षमता अधिक बळकट होईल&comma; असा विश्वास राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>म्हैसमळ टेकडी&comma; छत्रपती संभाजीनगर येथे सी-बँड प्रकारचा २५० कि&period;मी&period; परिघाचा रडार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>केंद्र सरकारकडे परभणी येथे हवामान निरीक्षणासाठी डॉपलर रडार बसविण्याची मागणी केली होती&period; ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याने म्हैसमळ टेकडी&comma; छत्रपती संभाजीनगर येथे सी-बँड प्रकारचा २५० कि&period;मी&period; परिघाचा रडार बसविण्याचे काम सुरू आहे&period; या केंद्रामुळे मराठवाडा विभागातील हवामान निरीक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे&period; या निर्णयामुळे मराठवाड्यातील शेती&comma; पीक संरक्षण&comma; हवामान पूर्वसूचना व आपत्ती व्यवस्थापनाला मोठा हातभार लागणार असल्याने राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version