Home Latest News अमरावती जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची नवीन रचना २२ ऑगस्टला अनेक तहसीलमध्ये बदल होणार

अमरावती जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची नवीन रचना २२ ऑगस्टला अनेक तहसीलमध्ये बदल होणार

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>अमरावती १९ &colon;<&sol;strong> अमरावती जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ रचनेची घोषणा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून&comma; आता २२ ऑगस्ट २०२५ रोजी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते अंतिम रचना जाहीर केली जाणार आहे&period; राज्य निवडणूक आयोगाने ही जबाबदारी विभागीय आयुक्तांना सोपवली आहे&period; यापूर्वी आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे व सचिव सुरेश काकाणी यांनी अमरावतीसह अन्य जिल्ह्यांना भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता&period; या काळात नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या&period; या हरकतींचा आणि सूचनांचा परिणाम अंतिम रचनेवर निश्चितच दिसून येणार आहे&period; नवीन मतदारसंघ रचनेत महत्वाचे बदल झाले असून&comma; चांदूर रेल्वे तहसीलमधील एक मतदारसंघ कमी करण्यात आला आहे&comma; तर अचलपूर तहसीलमध्ये एक नवीन मतदारसंघ वाढवण्यात आला आहे&period; याशिवाय&comma; मेळघाट वगळता बहुतांश मतदारसंघांची नावे बदलण्यात आली आहेत&period; काही भागांमध्ये जवळील गावे वगळून दूरच्या गावांचा समावेश केल्याने नागरिकांनी आक्षेप नोंदवले आहेत&period; पूर्वी ही जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे होती&period; मात्र आता&comma; ग्रामीण विकास विभागामार्फत विभागीय आयुक्त अंतिम निर्णय घेणार आहेत&period; या नव्या रचनेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना गती मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version