spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवनियुक्त केंद्रप्रमुख इंद्रायणी थुलकर यांचा सत्कार

किशोर साहू, मौदा  :- शिक्षिका इंद्रायणी थुलकर यांची खात केंद्राचे केंद्रसमन्वयक (केंद्रप्रमुख) म्हणून नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र जि. प. मागासवर्गीय शिक्षक संघटना, शाखा मौदा यांच्या वतीने त्यांचा शाल व गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुकराम रामटेके यांच्यासह विनोद हुमणे, सुदेंद्रू सुखदेवे, मच्छिंद्र कांबळे, सुरेंद्र डोंगरे , अरुण वाघमारे , विनोद बोरकर ,नंदेश गजभिये तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त केंद्रप्रमुख इंद्रायणी थुलकर यांच्या प्रशासकीय व शैक्षणिक कार्याचा अनुभव केंद्रातील शाळांना निश्चितच लाभदायी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. संघटनेच्या वतीने त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख थूलकर यांच्या कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त करत, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक व प्रभावी कार्य घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.