spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पी.एम.श्री. उच्च प्राथमिक जि.प. शाळा चाचेरच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी जीवन यशवंत सहारे यांची एकमताने फेरनिवड

किशोर साहू, मौदा,:- मंगळवार (ता. १ सप्टेंबर) ला पी.एम.श्री. उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा चाचेर येथे शाळा व्यवस्थापन समितीची महत्वाची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत सर्व पालक व सदस्यांनी एकमताने जीवन यशवंत सहारे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड केली. तसेच उपाध्यक्ष व इतर सर्व सदस्यांची देखील एकमताने निवड करण्यात आली.

जीवन सहारे यांच्या मागील कार्यकाळामध्ये शाळेच्या पटसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, शाळेच्या सर्वांगीण विकासात्मक कामांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. शाळेची भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांच्या काळात राबविण्यात आले. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन व त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सर्व पालक वर्गाने दुसऱ्यांदा त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. उपाध्यक्ष शुभांगी प्रकाश आंबीलढूके,रामकृष्ण आंबीलढूके, सुनील राऊत,प्रफुल बादोले, नितीन चौधरी, सुनीता वानखेडे,कीर्ती अढाऊ, सीमा चौरे ,अरभूनी ठोसरे, गुलाब पडोळे, किरण बरबटे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना जीवन सहारे यांनी सर्वांचे आभार मानले व यापुढेही शाळेच्या विकासासाठी व पटसंख्या वाढीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सरपंच लुंबिनी महेश कलारे, गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर नाकाडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रकाशजी काळे, शाळेचे मुख्याध्यापक अनिल गडपायले, शिक्षकवृंद रवींद्र घुगे, भारती साखरकर,परवीन शेख, प्रीती खंगार, शिल्पा उकुड्डे,नेहा निमजे, रुचिला खंडाईत,संगीता बालकोटे, शिक्षक वृंद, पालक वर्ग व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीमुळे चाचेर गावात,पालक वर्गामध्ये व शाळेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरातून जीवन सहारे यांचे अभिनंदन होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.