नागपूर :- विठ्ठलनगर क्रमांक १ जेष्ठ नागरिक समितीतर्फे दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात येतो. जेष्ठ नागरिक समितीच्या वतीने सामूहिक वाढदिवस कार्यक्रमांअंतर्गत माहे नोव्हेंबर मध्ये जन्मदिवस असणाऱ्या नऊ जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस 29 नोव्हेंबर रोजी, सार्वजनिक हनुमान मंदिर विट्ठलनगर-1 च्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शामराव गोमासे हे होते. यावेळी प्रमोद झुरमुरे, विट्ठलराव कावळे, ईश्वर बालपांडे, अमोल नागपुरकर, नरेंद्र मौदेकर, नारायण माने, प्रकाश कारू, प्रवीण निखारे, यशोदा पोंगाड़े यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी केवलराम पटोले, किशोर मेश्राम, अरुण परचंड, विनायक सेलुकर, रमेश डफरे, राजू मेश्राम, शालीग्राम मड़ावी, अरुण घोरमारे, रामराव रेवतकर, शंकर लांभाते यांची उपस्थिती होती. संचालन नरेंद्र त्रिवेदी यांनी तर आभार अध्यक्ष प्रेमदास नंदनवार यांनी मानले. सर्व जेष्ठ नागरिकांनी जेवणाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.




