spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको!

– मुख्यमंत्री सहायता निधीत अधिकाधिक योगदान द्या – प्रदेश भाजपातर्फे आवाहन

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्र, दूरचित्रवाहिनींच्या माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे प्रदेश कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे यांनी कळविले आहे.

होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याबाबत पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे, असे आवाहनही पक्षातर्फे करण्यात येत आहे.

Popular Articles