नागपूर :- महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आहेत,त्यात उत्तर नागपूरातील प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक/नगरसेविका यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. उत्तर नागपूरच्या विकासासाठी त्यांनी कामाला सुरुवात केलेली असली तरी काही सार्वजनिक क्षेत्रातील विविध विकास कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, त्यामुळे नॅार्थ नागपूर सिनीयर सिटिझन फोरम आणि नॅार्थ नागपूर महिला फोरम यांनी पुढाकार घेऊन आज आसीनगर झोनचे उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांना उत्तर नागपूर च्या विविध विकास कामे संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. सर्व प्रथम गणेश राठोड उपायुक्त यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर उत्तर नागपूर विभागातील विविध भागात विकास कामे त्वरित सुरु करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण पोलीस मुख्यालय या परिसरात सुलभ शौचालय उभारणी करण्यात यावी, उत्तर नागपूरातील प्रमुख रस्त्यावरील करण्यात आलेल्या वृक्षारोपणा अंतर्गत लावलेल्या झाडांना पाणीपुरवठा नसल्यामुळे चांगल्या प्रकारची झाडे उन्मळून पडतात त्यांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच फोरमच्या वतीने मागील दोन-तिन वर्षापासून एलआयसी चौक ते आटोमॅटिव्ह चौका पर्यंत चा सिमेन्ट रस्त्याची मागणी करण्यात आली होती त्या आता या कामाचा शुभारंभ झाला असला तरी सद्यस्थितीत असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे, तसेच पावसाळ्याच्या पूर्वी उत्तर नागपूर च्या निवासी भागातील नाल्याची सफाई आणि स्वच्छता करावी यासाठी प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तसेच या भागातील अनेक प्रमुख रस्तयावरील अतिक्रमणे हटवण्यात यावीत, चौकातील बंद वाहतूक सिग्नल पूर्ववत करण्यात यावी अश्या सूचना वजा मागणी करण्यात आली आहे.या सर्व मागण्यांवर राठोड उपायुक्त आसीनगर झोन यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे याबाबत फोरम ने समाधान व्यक्त केले. नॅार्थ नागपूर सिनीयर सिटिझन फोरम चे अश्विन बोरकर, नरेश साखरे, नरेश कोटांगले, लक्ष्मीकांत कठाणे, मोतीलाल नाईक, अनिरुद्ध बोदेले, अजय गौतम, रमेश गायकवाड, ॲड मोरेश्वर मंडपे, दिगंबर चनकापूरे तसेच महिला फोरमचे उषा उके, उषा जंगम, रंजना राऊत, गौतमी पानतावने आणि युवा ग्रॅज्युएट फोरम चे पल्लवी आटे, सुमेध बौध्द, धम्मा मनवर, विक्रम बोरकर, इतर अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.








