किशोर साहू, मौदा :- सोमवार 17 ऑगस्ट निवडणूक आयोगाने एसआयआर करण्याची शेवटची तारीख दिली होती. आज ग्रामपंचायत गांगणेर (हिवरा) येथील बीएलओ आशा वर्कर राऊत यांना ग्रामपंचायत कार्यालय विचारपूस केली असता ,त्यांनी एसआयआर चे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले. एकूण 765 मतदारांपैकी 663 मतदारांची एसआयआर पूर्ण झाले असून ज्या मतदारांचे एसआयआर झाले नाही असे 102 मतदारांचे नावे मतदान यादीतून कमी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उद्या मंगळवार 18 ऑगस्ट पासून अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांचे नवीन फॉर्म भरणे, दुरुस्ती करण्याचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नवीन मतदारांनी उद्यापासून फॉर्म भरून घेण्याचे व ज्या मतदारांच्या नावात काही दुरुस्ती करायची असल्यास तेही दुरुस्त करण्याचे आव्हान बीएलओ यांनी केले आहे.
सोमवार 17 ऑगस्टला एसआयआर च्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत गांगणेर (हिवरा) चे 100% काम पूर्ण, मतदान यादीतून 102 मतदार झाले कमी









