spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर अरोली येथे सुंदर सार्वजनिक डिजिटल वाचनालयाचे उच्चशिक्षित (एमबीबीएस, एमडी) युवतीकडून उद्घाटन

किशोर साहू, मौदा :-15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या पावन पर्वावर सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर, सरपंचा भुरे यांचा संकल्पनेतून तयार झालेले एक सुंदर सार्वजनिक डिजिटल वाचनालयाचे उद्घाटन अरोली गावातील उच्चशिक्षित असलेली हर्षा नारायण समरीत (MBBS.MD) यांचा हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सदानंद निमकर, तालुका शिवसेना अध्यक्ष प्रशांत भुरे, तंटामुक्त अध्यक्ष कैलास समरीत, अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत आणि ग्रामपंचायत चे सर्व सदस्यगण ,अधिकारी व पदाधिकारी तसेच गावातील नागरिक, महिला मंडळी व गावातील तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या भरगच्च उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या सार्वजनिक डिजिटल वाचनालयाच्या उपयोग गावातील तसेच बाहेर गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुला व मुलींनी नागरिकांनी घ्यावे, असे आव्हान याप्रसंगी सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांनी केले.

Popular Articles