Home Latest News पीएम श्री जि प शाळा दहेगाव येथे दीपावली सुट्टीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांकडून दीपावली...

पीएम श्री जि प शाळा दहेगाव येथे दीपावली सुट्टीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांकडून दीपावली सणाला साजेसे उपक्रम

0
94

किशोर साहू, मौदा, ता. २०:- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे शुक्रवार ( दि. 16 ऑक्टोबर) ला दीपावली सुट्टीच्या पूर्वदिनी विद्यार्थ्यांकडून दीपावली सणाला साजेशे विविध उपक्रम घेण्यात आले. त्यात संगीत दीपोत्सव, रांगोळी स्पर्धा, तसेच आकाश कंदील बनविण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरुवातीला प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना साहित्य देऊन त्यांच्याकडून आकाश कंदील, फुलपाखरू, दिव्याचे छायाचित्र असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते. मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाद्वारे आपले सण कसे साजरे करतात याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रत्येक उपक्रमात भाग घेणे का गरजेचे आहे ?याबद्दल मार्गदर्शन केले. आकाश कंदील कसे तयार करायचे याबाबतीत शिक्षकवृंद सुजाता बोदेले, सुधीर कांबळे, सुधीर खंडाईत, लीलाधर काळबांधे, राजेश रोहाड , प्रज्ञा रामटेके, संगीता कारेमोरे यांनी विशेष प्रयत्न केले . या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आणि उत्कृष्ट फोटोग्राफी उमेश उके ,पुष्पलता उके, कैलास फटिंग यांनी केले .कार्यक्रमाचे संचालन राजेश रोहाड तर आभार सुधीर खंडाईत यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.