spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जागतिक महिला दिनानिमित्त नागपुरात, स्त्री हक्कांचा जागर ची भव्य रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे भव्य आयोजन संपन्न

नागपूर :- जागतिक महिला दिनाच्या औचित्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कष्टमय आयुष्यातून मार्ग काढत स्वतःचे अस्तित्व तयार केलेल्या तरन्नुम अन्सारी व सोनाली ढाकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. विचारांचा जागर, संविधानिक मूल्यांची जनजागृती व महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्या च्या उद्देशाने कॉटन मार्केट येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून गांधीसागर तलावापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन व रॅलीत जागतिक महिला दिन जिंदाबाद, संविधान जिंदाबाद यांसारख्या घोषणा व प्लायकार्ड व पत्रकद्वारे जनजागृती रॅली दरम्यान करण्यात आली. रॅलीनंतर गांधीसागर तलाव परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, प्रेरणादायी गीते, पोवाडे तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम घेतले व समाजातील महिलांवरील अत्याचार, महिला सुरक्षा यंत्रणा, समान हक्क, शिक्षण, सामाजिक न्याय व संविधानिक अधिकार याबाबत समाजभान निर्माण करून जागृतीचा संदेश विविध माध्यमांतून समाजापर्यंत पोहचविणे हा प्रमुख उद्देश होता.

हा कार्यक्रम संविधान जागर अभियान संविधानिक महिला संघ, सत्यशोधक संविधानिक महिला संघटना ओबीसी महिला महासंघाच्या पुढाकाराने घेतला. याप्रसंगी डॉ. नितीन राऊत यांनी सदिच्छा भेट दिली व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. बुद्धविहार समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमात ॲड. सुषमा भड यांनी ८ मार्च चा इतिहास व कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडताना महिलादिन मागे स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या महिलांचा संघर्षाचा इतिहास आहे आजही स्त्री सुरक्षित नाही म्हणून भयमुक्त समानतेच्या वाटेवर चालणाऱ्या भेदभाव विरहित सशक्त समाज निर्मितीसाठी आता महिलांनी पुढे येऊन संविधानिक मूल्याची जोपासना करणारा समाज निर्माण करणे काळाची गरज आहे असे आवाहन केले तसेच डॉ. सरोज आगलावे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला व वर्षभर स्त्री हक्काचा जागर करण्याचे आवाहन केले. शहरातील विविध सामाजिक, महिला व प्रबोधनात्मक संघटनांचे पदाधिकारी अंजली गुडध्ये ॲड. समीक्षा गणेशे, बेनझीर खान, मृणालिनी दहीवाडे, ॲड. रेखा बारहाते, बाबा बिडकर, वंदना धाबर्डे, सचिन मुन, मनिष वानखेडे, देवानंद बडगे कृषा नगरकर स्वप्नील फुसे उपस्थित होते व त्यांच्या टीमद्वारे गाणी, नाटक, डान्स असे उपक्रम सादर केले. विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संचालन ॲड. मोनाली अपर्णा यांनी तर अर्चना बरडे यांनी आभार मानले. आयोजकांन मध्ये ओबीसी वकील महासंघ, सत्यशोधक संविधानिक महिला संघटना, ओबीसी महिला महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ, जमाते इस्लामी हिंद महिला संघ, सत्यशोधक समाज, अ.भा.सावित्री ब्रिगेड, बहुजन संघर्ष, लॉर्ड बुध्द टीव्ही, महिला क्रांती परिषद 1942, नमो बुध्दाय महिला समूह, संघमित्रा बहूउद्देशीय संस्था, सम्यक संकल्प संघ, धम्मधर संघ, राष्ट्रीय पारिवारिक धम्म संघोष्टी, संविधान जागर अभियानांतर्गत राबविण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.