spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाशिवरात्रि निमित्त अरोली येथील शिव मंदिरात निशुल्क भव्य स्त्रीरोग तपासणी शिबिर 

किशोर साहू, मौदा :- भंडारा येथील पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे अरोली येथील शिव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सर्व गर्भवती महिला व स्त्री रोगाने पीडित महिलांसाठी आज रविवार ( ता. 15 फेब्रुवारी)ला सकाळी आठ ते अकरा पर्यंत निशुल्क भव्य स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनघा खरवडे (भिवगडे) स्त्रीरोगाने पीडित महिलांची तपासणी करणार आहेत. तरी या भव्य निशुल्क स्त्रीरोग तपासणी शिबिराचा स्त्रीरोगाने पीडित महिलांनी लाभ घेण्याचे आव्हान, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे, सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी केले आहे.

Popular Articles