spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आपली बसच्या खापरी आगारात महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते व मान्यवारांच्या उपस्थितीत 57 रोपांचे वृक्षारोपण

नागपूर :-  महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन व ‘हरित नागपूर’ अभियानाला चालना देण्यासाठी एका विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या खापरी आगार येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसरात मान्यवरांच्या हस्ते ५७ वृक्षांचे रोपण करण्यात आले.

याप्रसंगी मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, परिवहन व्यवस्थापक मिलिंद मेश्राम, परिवाहन प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे, कार्यकारी अभियंता पंकज पारशर, व्यवस्थापक ऑपेरेशन राजीव घाटोळे, गजानन नागूलवार, प्रवीण सरोदे, यांच्यासह डेपोचे अधिकारी व चलो मोबिलिटी चमूचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. पर्यावरण संरक्षण, शहरातील हरित क्षेत्रामध्ये वाढ करणे, तसेच स्वच्छ व प्रदूषणमुक्त नागपूर शहराच्या निर्मितीस हातभार लावण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

Popular Articles