किशोर साहू, मौदा :- क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि अस्मितेसाठी केलेला संघर्ष व त्याग आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे आज रविवार( ता.9 ऑगस्ट) ला जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बाबदेव येथे तारसा- धामणगाव जि प सर्कल बाबदेव येथील भाजपचे नेते व भाजपचे भावी जि प सदस्याचे उमेदवार प्रवीण कारेमोरे यांच्या सौजन्याने क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी टेकचंद सावरकर माजी आमदार, कामठी-मौदा विधानसभा, देवेंद्र गोडबोले माजी जि. प. सदस्य नागपूर,विरेंद्र पायतोडे उपाध्यक्ष, भाजयुमो नागपूर जिल्हा ग्रामीण, रामटेक, प्रवीण कारेमोरे भाजपा नेते तारसा-धामणगाव जि प सर्कल, स्नेहल वरखडे सरपंच गट ग्रामपंचायत, बाबदेव,शिवशंकर डांगरे अध्यक्ष, बाबदेव अमोल बावणे बूथप्रमुख, बाबदेव,गणेश वरठे, गंगाधर कुंभरे,आकाश येळणे, संजू वाघमारे, भूषण सावरकर ,किशोर डांगरे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





