spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘फिट इंडिया’ चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सुबोध गांगुर्डे यांचे नागपुरात ऐतिहासिक स्वागत; 43,511 किलोमीटरचा सायकल प्रवास!

नागपूर :- ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि लॉयन्स क्लब ऑफ रोहा चे सदस्य, प्रसिद्ध सायकलपटु रायगड जिल्ह्यातील रोहा गावांचे सुपुत्र सुबोध गांगुर्डे यांचे त्यांच्या ‘शक्ती संकल्प सफर’ या महा- मोहिमेअंतर्गत नागपूर शहरात आगमन झाले. पर्यावरण संवर्धन आणि ‘ड्रग फ्री इंडिया’ (व्यसनमुक्त भारत) या उदात्त हेतूने सुरू असलेल्या त्यांच्या या साहसी सायकल प्रवासाचे नागपूरकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल नागपूरकर भोसले राज परिवाराच्या वतीने नागपूर महाराज राजे मुधोजी भोंसले यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. प्रवासाची सुरुवात 19 जुन 2024 रोजी जगातील सर्वात उंच आणि हाडे गोठवणाऱ्या ‘उमलिंगला पास’ (19,000 फूट उंची) येथून भारतमातेचा तिरंगा हाती घेऊन प्रवासाला सुरुवात.

अभूतपूर्व टप्पा: आज त्यांच्या या सलग आणि खडतर प्रवासाचा 790 वा दिवस असून, त्यांनी आतापर्यंत सायकल ने तब्बल 43,511 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. देशातील तरुणांना आरोग्याचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यासाठी सुबोध गांगुर्डे यांनी हे मोठे शिवधनुष्य उचलले आहे. ऊन, वारा, पाऊस आणि अतिशय प्रतिकूल हवामानाचा सामना करत त्यांनी हा पल्ला गाठला आहे. नागपुरात आगमन होताच भोसले राज परिवाराने त्यांच्या या अफाट जिद्दीचे, चिकाटीचे आणि राष्ट्रप्रेमाचे विशेष कौतुक केले. यावेळी लायन्स क्लब फ्रेंड्स चे विनेश गुजरकर, अजय मंडपे, योगेश घाडगे, क्रीडा भारती संस्थेचे प्रसाद देशपांडे, महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे सचिव अतुल ढगे, राहुल सूर्यवंशी उपाध्यक्ष हाजी सय्यश शब्बीर उर्फ शब्बू भाई, मुख्य प्रवक्ता सारंग ढोक, सदस्य क्रमश अशोक पालकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मुधोजी राजे नीं आणि उपस्थित मान्यवरांनी सुबोध गांगुर्डे यांचा प्रवास संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, त्यांच्या पुढील प्रवासासाठी आणि संकल्पासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Popular Articles