spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निवडणुकीच्या विविध परवानग्यांसाठी मनपात ‘एक खिडकी कक्ष’ कार्यान्वित

नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना विविध परवानग्या आणि प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत, यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालय, सिव्हील लाईन येथे ‘केंद्रीय एक खिडकी कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. आजवर १३७ अर्ज केंद्राला प्राप्त झाले असून, यातील २० अर्जांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले आहे. केंद्राद्वारे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देणे सुरू असून, शनिवार ता.२० डिसेंबर रोजी देखील ही सेवा सुरू राहणार आहे.

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली असून, येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा मुख्यालयातील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयजवळ इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांच्या सोईसाठी ‘केंद्रीय एक खिडकी कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना महानगरपालिकेच्या मालमत्ता कर, पाणी कर आणि भाडेपट्टा कर असे कोणतीही थकबाकी नसल्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र सादर’ करणे आवश्यक आहे. त्यासाठी मनपाचे ना-देय प्रमाणपत्रासाठी ‘केंद्रीय एक खिडकी कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या अधिकृत जाहिरात फलकांसाठी जाहिरात परवाना कक्ष, नागपूर शहरात प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या अधिकृत परवानगीसाठी वाहन परवाना कक्ष, स्टार प्रचारकांच्या सभेसाठी सभा परवानगी कक्ष आणि स्टार प्रचारकांच्या रॅलींच्या नियोजित परवानग्यांसाठी रॅली परवानगी कक्ष असे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना विविध परवाग्यांकरिता एक खिडकी कक्षात अर्ज करण्याची सुविधा सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

Popular Articles