spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अफू तस्करीचा पर्दाफाश; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

– दोन किलो अफूसह वाहने जप्त; अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

भिवापुर :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि मयंक माधव, सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, उमरेड उपविभाग यांच्या मार्गदर्शनात अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक नागपुर ग्रामीण आणि भिवापुर पोलीसांनी संयुक्त कारवाई करत दिनांक १५/११/२०२६ रोजी अवैधरित्या अंमली पदार्थ अफुची वाहतुक करणाऱ्या आरोपींवर गुन्हा नोंदवुन २.००३ किलोग्रॅम अफु जप्त केला.

दिनांक १५/११/२०२६ रोजी नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाला बुटीबोरी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बोलेरो पिकअप व इकोस्पोर्ट या मध्यप्रदेश आणि राजस्थान पासिंगच्या वाहनांमधून अफू हया अंमली पदार्थाची वाहतुक करण्यात येत आहे वाहून त्यांनी सदर माहीती वरिष्ठ अधिकारी यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस स्टेशनच्या तांत्रिक सहकार्याने संशयित वाहनांचा शोध घेतला असता बेला ते सार्शी रोडवर दोन्ही वाहने आढळून आली. पोलिसांनी वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकांनी वाहने भरधाव वेगाने भिवापूरच्या दिशेने पळविली. त्यानंतर भिवापूर पोलीस पथकाच्या मदतीने दोन्ही वाहनांचा पाठलाग करून नांदा गावात वाहने थांबविण्यात आली. यानंतर पोलीसांनी पंचासमक्ष दोन्ही वाहनांची झडती घेतली असता इकोस्पोर्ट वाहनाच्या डिक्कीमध्ये अंमली पदार्थ अफूचे दोन बंडल आढळून आले. आरोपी क्र. १) पवन सत्यनारायण उर्फ कालिदास पाटीदार, वय ३० वर्षे, रा हा इकोस्पोर्ट वाहन चालवुन वाहनातुन अंमली पदार्थ अफुची वाहतुक करीत होता.

तसेच आरोपी क्र २) लोकेशकुमार सत्यनारायण उर्फ कालिदास पाटीदार, वय ३२ वर्षे हा बोलेरो पिकअप वाहन चालवत होता. तो इकोस्पोर्ट वाहनाच्या पुढे जाऊन मार्ग मोकळा असल्याची खात्री करून देत पायलट वाहन म्हणून काम करीत होता. दोन्ही आरोपी रा. बसेडीभाटी, तहसील जावद, जिल्हा नीमच, मध्यप्रदेश येथील रहिवासी असून ते सख्खे भाऊ आहेत.

पोलीसांनी पंचासमक्ष २.००३ किलोग्रॅम अफु एकुण किंमत १०,०१,५००/- रूपये इकोस्पोर्ट वाहन क्र. आर जे ०९ सी सी ०३३९ महींद्र बोलेरो पिकअप वाहन क्र. एम पी १३ ए एल ८७९५, रोख रक्कम २५००/- रूपये आणि ०५ मोबाईल असा एकुण किंमत ३०,६५,५०० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे.

नमुद प्रकरणी आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन भिवापुर येथे कलम ८ (क), १७ (ख), २२, २९ एन.डि.पि.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन साखळी पुरावे जोडुन नागपुर ग्रामीण पोलीस सदर गुन्हयाचा तपास करीत आहेत.

Popular Articles