पाचगाव :- पाचगाव पोलीसांना गुप्तबामीदारा द्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा मटकाझरी येथे सार्वजनिक ठिकाणी काही इसम ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळत आहे. पोलीसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी नामे १) रफिक खान अहमद खान, वय ४८ वर्ष, रा. उप्पलवाडी नागपुर २) नावेद शेख इस्माइल, वय ३० वर्ष, रा. उप्पलवाडी नागपुर, ३) अदर इस्माइल शेख, वय ४० वर्ष रा. नागपुर, ४) नई मुददीन सलीम मुददीन शेख वय ४८ वर्ष रा. नागपुर हे जागीच जुगार खेळतांना मिळुन आले.
पोलीसांनी पंचासमक्ष आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ ताशपत्ते, एकुण रोख रक्कम २९८० /- रुपये, ३ मोबाईल आणि इतर साहीत्य असा एकुण २०,९८०/- रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. नमुद प्रकरणी वरील आरोपी यांच्या विरुद्ध कलम १२ म.जू. का. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.






