Home Latest News प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तत्काळ निकाली काढावेत इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे...

प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तत्काळ निकाली काढावेत इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे महाविद्यालयांना आवाहन

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत की&comma; भारत सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती&comma; शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेंतर्गत प्रलंबित असलेले सर्व अर्ज तातडीने निकाली काढावेत&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क मंजुरीसाठीचे अर्ज मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत&period; सदर अर्ज वर्षनिहाय पुढीलप्रमाणे प्रलंबित आहेत&period; २०१९-२०२० &colon; १८२ अर्ज&comma; २०२०-२०२१ &colon; २१८ अर्ज&comma;२०२१-२०२२ &colon; २१९ अर्ज&comma;२०२२-२०२३ &colon; २८२ अर्ज&comma;२०२३-२०२४ &colon; २७४ अर्ज&comma;२०२४-२०२५ &colon; १५५६ अर्ज&comma;२०२५-२०२६ &colon; ५८५० अर्ज&comma;प्रलंबित आहे&period; विभागाने स्पष्ट केले आहे की&comma; संबंधित सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीसाठी महाविद्यालयांनी त्वरीत सादर करावेत&period; अन्यथा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील&period; तसेच विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेता येणार नाही&comma; याचीही सूचना देण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य सूचना देण्यासाठी शाळांमध्ये नोटिसा प्रसिद्ध करणे&comma; सूचना फलकावर माहिती लावणे&comma; विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअॅप गट तयार करणे आणि नोडल अधिकारी &lpar;समन्वय अधिकारी&rpar; नेमणे या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत&period;सहाय्यक संचालक&comma; इतर मागास बहुजन कल्याण&comma; यवतमाळ यांनी नमूद केले आहे की&comma; &OpenCurlyDoubleQuote;ऑनलाईन आणि ऑफलाईन बैठकांद्वारे अनेक वेळा सूचना देण्यात आल्या असूनही काही महाविद्यालयांनी गांभीर्याने कार्यवाही केलेली नाही&period; त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहात आहेत&period; त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी तत्काळ कार्यवाही करून प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढावेत&comma; असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग&comma; यांच्या वतीने करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version