Home Latest News जिल्हास्तरीय युवा महोत्सव युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय युवा महोत्सव युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> युवकांच्या अंगी दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे&period; केंद्र शासनाच्या वतीने आयोजित होणारा हा महोत्सव दि&period; 7 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे पार पडणार आहे&period; या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा&comma; कथालेखन&comma; चित्रकला&comma; लोकनृत्य &lpar;सांघिक&rpar;&comma; लोकगीत &lpar;सांघिक&rpar;&comma; कविता लेखन&comma; नवोपक्रम &lpar;विज्ञान प्रदर्शन&rpar; अशा विविध कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>वयोगट 15 ते 29 वर्षांतील युवक-युवतींना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे&period; सहभागी स्पर्धकांचे वय 12 जानेवारी 2025 रोजी 15 ते 29 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे&period; त्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा आधारकार्डाची सत्यप्रत सोबत जोडणे बंधनकारक आहे&period; स्पर्धकांनी सादरीकरणासाठी लागणारे साहित्य स्वतःकडे ठेवावे&comma; मात्र स्टेज व विद्युत व्यवस्था संयोजन समितीमार्फत पुरविली जाईल&period; स्पर्धेदरम्यान असभ्य वर्तन अथवा धार्मिक व राजकीय भावना दुखावणारे सादरीकरण आढळल्यास संबंधित स्पर्धक अपात्र ठरविण्याचा अधिकार संयोजन समितीकडे राहील&period; तसेच पंचांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील&comma; याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर पर्यंत सायं&period; 4 वाजेपर्यंत असून&comma; अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय&comma; यवतमाळ येथे स्वीकारले जातील&period; जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी युवक-युवतींना या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version