spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आमच्या फाटाफुटीमुळे उपवर्गीकरणाच्या वादाला बळ मिळत आहे – नारायण बागडे

नागपूर :- आपणच एकमेकांसोबत संगतीत आणि पंगतीत बसत नाही, हा दुराभाव अनुसूचित जातीतील विविध घटकांना खटकत असतो. मग आम्ही त्यांच्या जवळ गेलो तर हे खरोखर रोटी-बेटीची सोयरिक साधतील का, असा प्रश्न त्या घटकांकडून उपस्थित केला जातो. अजूनही आपल्या ऐक्यावर ग्रहण लागलेले आहे. आपणच सत्तेकडे देणग्या मागत फिरत असू, तर आमचं काय होणार, असा सवाल ते करतात. आमच्या फाटा फुटीमुळेच उपवर्गीकरणाच्या वादाला बळ मिळत आहे. अशी प्रांजळ कबुली नारायण बागडे यांनी दिली. ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “अनुसूचित जाती समन्वय अभियान” प्रारंभी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या निवासस्थानी मातंग समाजातील महिला कार्यकर्त्यांनी औक्षण करून त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मन्यवर उपस्थित होते. यामध्ये सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष रवी शेन्डे माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बन्सोड, गर्जना संघटनेचे अध्यक्ष महेश ठाकूर, आंरिमोचे नेते धर्मा बागडे, ओबीसी नेते राजु पांजरे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, रिपाइं आठवले शहराध्यक्ष विनोद थुल, सेवानिवृत्त वित्त व लेखा अधिकारी जयदेव चिवंडे, मातंग मोर्चाचे नेते मनोहर इंगोले व शायर तन्हा नागपुरी आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात. संचालन प्रा.रमेश दुपारे यांनी तर आभार पुण्यशिल बोधिले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोजराज नंदागवळी, प्रकाश कांबळे, आणि अमोल बागडे यांनी विशेष परिश्रम घेतलेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.