भंडारा कालव्याला पाणीही सुटले अनं भंडारा जिल्ह्यातील मजुरांच्या गॅंगाही( जत्थेही) आल्या
किशोर साहू, मौदा, ता.२९ : सोमवार (दि.28 जुलै)ला दुपारी २ वाजता भंडारा कालव्याला पाणी सोडण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालेली असून दोन दिवसापासून दरवर्षीप्रमाणे यंदाही भंडारा जिल्ह्यातील नवेगाव बांध, कुजबी व इतर अनेक गावागावातून धान रोवणी करायला मजुरांच्या गॅंगा धानपट्टा मधून प्रसिद्ध असलेला मौदा व रामटेक तालुक्यातील गावागावात दाखल झालेले असून उद्या मंगळवार (दि.19 जुलै) पासून धान रोहिणीला युद्ध स्तरावर सुरुवात होणार आहे.
यंदा पावसाने वेळोवेळी रामटेक व मौदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये समाधानकारक हजेरी लावल्याने ,धान रोवणी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे पर्हे सज्ज झालेले आहेत. त्यामुळे गावागावात शेतकरी व मजुरांमधील प्रसिद्ध संवाद माझी पात सोडून जाऊ नका (म्हणजे माझी धानाची रोवणी झाल्याशिवाय दुसऱ्या शेतकऱ्यांच्या रोहिणीला सुरुवात करू नका)असा संवाद ऐकवण्यात मिळत आहे. पात सोडण्याच्या वाद विवादावरून शेतकरी व मजुरांमधील भांडणही विकोपाला जाण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात, हेही विशेष!







