– वय व शिक्षणाची अट नाही; प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगावबांध :- बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने नवेगावबांध येथील बुद्ध विहारात पाली भाषा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पाली भाषेचा अभ्यास व तिचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेला बसण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसून शैक्षणिक पात्रतेचीही अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक कोणतीही व्यक्ती या परीक्षेला बसू शकते. परीक्षेची फी १०० रुपये असून, या शुल्कामध्ये परीक्षेचे पुस्तकही देण्यात येणार आहे.
नवेगावबांध येथे ही परीक्षा २३ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून, परीक्षेसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी केंद्रप्रमुख विशाखा सचिन सांगोळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र लाडे यांनी केले आहे.





