spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिडीपेठ येथील संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात

नागपूर :- संत गजानन महाराज उत्सव समिती च्यावतीने यंदा ‘पालखी सोहळा’ चे ३४ वे वर्ष होते. ०७ फेब्रुवारी ला श्री गजानन मुर्तीची स्थापना व श्री गजानन ‘विजय ग्रंथ’ पारायण करण्यात आले. तसेच दुपार च्या सत्रात महिला वारकरी भजन मंडळाचे भजनाचे सादरीकरण झाले. त्यानंतर सायंकाळी सरगम संगीत अकॅडमीचे भरत नरुले यांचे स्वरांनी बिडीपेठ वासीयांना मंत्रमुग्ध केले. रविवारी ला सायंकाळी, ह.भ.प. कुणाल फुलझेले महाराज व संच ‘पालखी सोहळा’ केला. भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ‘गण गण गणात बोते’, ‘श्री गजानन महाराज की जय’ घोषनांनी नविन बिडीपेठ दुमदुमले. पालखी सोहळयाचे प्रमुख आकर्षण राहिले ते ‘गजानन माऊली ग्रुप’ चे लेझिम व पथनृत्य पथक, नविन बिडीपेठ यांचे पथनृत्य सादरीकरण.

त्यानंतर दि. ९ फेब्रुवारी ला ह.भ.प. सोनटक्के महाराज व संच मंडळी यांचे व्दारे ‘गोपालकाला किर्तन’ करण्यात आले. या प्रसंगी संजय महाकाळकर (नगरसेवक) सिध्दु कोमेजवार, स्वप्नील कुंदेलवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. संत गजानन उत्सव समितीचे कार्यकर्ते रोहण गोसेवाडे, तुषार कडवे, प्रतिक कातुरे, सोनु खोकरे, आशिष ठवकर, उमेश क्षिरसागर, प्रशांत अंधारे, विशाल होरे, अप्रित डेहनकर, हटवार बंधु, योगराज महाजन, निलेश अंबारे, अर्जुन गोसेवाडे, गिरीश बुरबुरे, अमोल सौंदरकर, शिवम कडवे, बाबु, तसेचे महिला मंडळाचा सहयोग लाभला. त्यात वनिता गोसेवाडे, कविता मोरे, स्नेहा होरे, शारदा वनकर, कांचन अंधारे, संगिता अंबारे, गीता हलमारे, सोनाली हरडे, मेघा सावरकर, पुष्पा वंजारी, मीना झंजाळ, वैशाली बानाबाकोडे व बालकांचे सुध्दा योगदान मिळाले. या सर्व कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार राजेश वनकर यांनी मानले.

Popular Articles