spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिग्रस येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

यवतमाळ, दि. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात 100 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार दिग्रस येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करीयर सेंटर आणि बापुरावजी बुटले कला, नारायणराव भट वाणिज्य, बापुसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्याकरीता जिल्ह्यातील 103 उमेदवारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. ए.आर. लाडोळे, प्रमुख उपस्थिती म्हणून व्यवसाय व शिक्षण विभाग प्रमुख प्रा. पी. एम. दिवे, महाविद्यालयाचे प्रा.एच.आर देशपांडे, मार्गदर्शक संजय निरपासे, कार्यक्रमाचे नोडल अधिकारी  आकाश गावंडे उपस्थित होते.

मेळाव्याकरीता मार्गदर्शक म्हणून लाभलेले करीयर व योग मार्गदर्शक संजय निरपासे यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करियर व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत आहे, अशा संधीचे आपण सोने करावे तसेच आपले करीयर विषयक नियोजन स्वत: तयार करुन त्या दिशेने आपले कर्तव्य पार पाडावे, असे सांगितले.

या करीयर व रोजगार मार्गदर्शन मेळाव्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प.भ. जाधव दुरदृष्यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. विभागाच्या योजनांची माहिती आकाश गावंडे यांनी विषद करुन सर्वात शेवटी सर्वांचे आभार मानले.

Popular Articles