spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा संपन्न

 

गडचिरोली, दि. २५ : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली  व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 जुलै 2025 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार  मेळावा आयोजित करण्यांत आलेला होता. 

सदर रोजगार मेळाव्याला अध्यक्ष म्हणुन डॉ. अनिल हिरेखण, कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित उमेदवारांना कुठलेही ध्येय प्राप्त करायचे असेल तर प्रयत्नांची सातत्यता, कठीण परिश्रम करुन  उपलब्ध संधीची सोने करता येते. तरी सर्व उमेदवारांनी आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन  डोंगरे, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, कार्यालय गडचिरोली,  नितनवरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन गडचिरोली व अनिरुद्ध गचके, सहाय्यक प्राध्यापक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली हे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी सद्यस्थितीत व भविष्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधीचा लाभ घेऊन नोकरी प्राप्त करुन घ्यावी असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सदर मेळाव्याला महत्मा फुले मागास वर्ग, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय, शबरी इत्यादी सर्व महामंडळाचे व्यवस्थापक, वरिष्ठ समन्वयक, अभियान समन्वयक व शासकिय यंत्रणा एकात्मिक आदिवासी विकास व मत्स्य व्यवसाय त्यांचे प्रतिनिधी स्वयंरोजगाराच्या माहितीपत्रकासह सदर मेळाव्याला उपस्थित राहून मेळाव्यात सहभागी उमदेवारांना स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करुन प्रोत्साहित केले. यावेळी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेंद्र शेंडे, सहाय्यक आयुक्त, जिकौविरोवउमाकें गडचिरोली यांनी केले. प्रास्ताविकेत विभागाच्या संपूर्ण योजना व नाविन्यपुर्ण उपक्रमाची माहिती देण्यात आली. 

यावेळी रोजगार मेळाव्याला एल.आय.सी. गडचिरोली, ए. आर. इंडस्ट्री, आदिवासी बांबु सहकारी संस्था, गडचिरोली, एस.बी.आय. लाईफ इन्स्युरन्स, गडचिरोली, आर्या कार्स गडचिरोली, सहयोग मल्टिस्टेट क्रेडीट को- ऑपरेटीव्ह सोसायटी नागपूर, मुथुट फॉयनान्स नागपूर, वैभव एंटरप्राईज नागपूर, व्हिनस ऑटोमोटीव्ह गडचिरोली, सत्या मायक्रो कॅपीटल नागपूर इत्यादी 13  विविध कंपन्या व त्यांचे उद्योजक यांच्याकडील इन्स्युरन्स ॲडवाईझर/ मशीन ऑपरेटर ट्रेनी/वेल्डर/टर्नर/ मेकॅनिक/ कॉम्पुटर ऑपरेटर/ सेल्स कंन्सल्टन्स/टेक्निशियन/ सर्व्हिस ॲडवाईझर/फ्लोअर सुपरवायझर/ रिलेशनशिप ऑफिसर/ अप्रेंटिशिप ट्रेनी/ एच.आर./ सेल्स 

मॅनेजर/ डिलर सेल्स एक्झीक्युटीव/ फिल्ड सर्व्हिस ॲडवायझर/ अकाऊंट ऑफिसर/ अंकाऊन्टंट /पॅन्ट्रीमेड/ सिक्युरिटी गार्ड/ प्रोडक्शन ट्रेनी इत्यादी 929 विविध  रोजगाराच्या संधीचा लाभ घेणेकरीता एकुण 588 उमेदवार उपस्थित होते. यावेळी  126 इतक्या उमेदवाराची रोजगारासाठी प्राथमिक निवड करण्यात आली. यावेळी आदिवासी उमेदवारांकरीता कौविरोवउमावमाकें गडचिरोली येथील स्पर्धा पुर्व प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांना 04 पुस्तकांचा 01 संच व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  चव्हाण सर, प्राध्यापक, मराठी विभाग, गोविग तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  भाग्यश्री वाघमारे, कौविरोवउ मार्गदर्शन अधिकारी, गडचिरोली यांनी केले. 

दिनांक 22 जुलै 2025 याच दिवशी राजे धर्मराव सायन्य कॉलेज अहेरी येथे प्लेसमेंट ड्राईव्ह व समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी सिएट टायर कंपनी नागपूर सदर प्लेसमेंट ड्राईव्ह ला उपस्थित होती. यावेळी उपस्थित  75 उमेदवारांपैकी 45 उमेदवारांची प्राथमिक निवड आणि 05 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. तसेच गोंविदराव मुनघाटे, महाविद्यालय, कुरखेडा ता. कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथील रोजगार व स्वयंरोजगार समुपदेशन सत्रामध्ये 60 इतके उमेदवार उपस्थित होते. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणुन डॉ. जयदेव देशमुख यांनी करीअर गायडन्स व वाणिज्य आणि डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी रोजगार व स्वयंरोजगार विषयावर मार्गदर्शन केले. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी कळविले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.