spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जि प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोदामेंढी येथे आज पालक सभा; शालेय व्यवस्थापन समितीसह विविध समित्यांचे होणार पुनर्गठण 

किशोर साहू, मौदा :- जि प हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोदामेंढी येथे शिकत असलेल्या 5 ते 12 वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी, आज मंगळवार (ता. 22 सप्टेंबर)ला सकाळी 11 वाजता पालक सभेचे आयोजन करण्यात आले.

या पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण, सखी सावित्री समितीचे पुनर्गठण, महिला तक्रार निवारण समितीचे पुनर्गठण, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा व वेळेवर येणारे इतर विषयावर चर्चा होणार आहे. तरी या पालक सभेला शाळेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान शाळेचे मुख्याध्यापक सुरेश ढोके यांनी सोशल मीडियाच्या विविध ग्रुप वर तसे पत्र टाकून केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.