Home Latest News पार्किंग माफियांची भाविक-पर्यटकांवर मुजोरी

पार्किंग माफियांची भाविक-पर्यटकांवर मुजोरी

0

<p>नाशिक &colon; त्र्यंबकेश्वर येथील पार्किंग माफियांच्या मुजोरी व दादागिरीमुळे भाविक-पर्यटकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत&period; ज्यांना पार्किंगचा ठेका मिळाला आहे&comma; तेच सराईत गुन्हेगारांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांची लुटमार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे&period; सदर वसुली ही फक्त त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातच नाही तर जव्हारकडे जाणाऱ्या गाड्यांनाही अडवून वसुली केली जात आहे&period;<br &sol;>&NewLine;&&num;8216&semi;पुढारी न्यूज&&num;8217&semi;चे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्यासह इतर माध्यम प्रतिनिधींना पार्किग माफियांकडून मारहाण झाल्यानंतर या माफियांचे अनेक कारनामे समोर येत आहेत&period; या गुंडांकडून बाहेरून येणाऱ्या भाविकांना लुटले जातच शिवाय नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनाही त्रास दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी आहे&period;राजकीय विश्लेषण<br &sol;>&NewLine;त्र्यंबकेश्वर येथे हजारो भाविक देशभरातून येतात&period; अनेक भाविक हे स्वतःच्या खासगी वाहनांतून येतात&period; त्यामुळे पार्किंगचा मुद्दा येथे महत्त्वाचा आहे&period; मात्र&comma; पार्किंगच्या नावाखाली येथे माफिया अक्षरशः भाविकांची लूट करीत आहेत&period; शहरात भाविकांची वाहने दाखल होताच तातडीने या गुंडाचे टाेळके पुढे येऊन पावती दाखवतात व अक्षरशः पठानी पद्धतीने वसुली करतात&period; पार्किंग माफियांचे हे रॅकेट त्र्यंबकेश्वर पुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर ज्यांना त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हार- मोखडा जायचे आहे अशा वाहनधारकांना देखील आडवून त्यांच्याकडूनही वसुली करण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलेली आहे&period; त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंगसाठी विशिष्ट जागा शासनाकडून देण्यात आली आहे&period; त्या परिसरातच पार्किंग केल्यानंतर नियमाप्रमाणे पार्किंग शुल्क घेणे अपेक्षित आहे&period; मात्र&comma; थेट महामार्गावर येऊन गाड्या अडवून ही वसुली केली जाते&period; फक्त वाहन चालकाकडून लूट करण्यापूर्वीच हे पार्किंग माफिया मर्यादित राहिलेले नाहीत&period; येणाऱ्या भाविकांना तुमचं दर्शन लवकर करून देतो&comma; असे सांगून अव्वाच्या- सव्वा पैसे घेतात व त्यांना कुठल्यातरी गल्लीच्या कोपऱ्यात जाऊन सोडून दिले जाते&period; परराज्यातून आलेल्या भाविकांना या परिसराबद्दल कुठलीही माहिती नसते&period; त्यामुळे त्यांची फसवणूक होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari news<&sol;p>&NewLine;

Exit mobile version