कामठी :- डॉ केशव हेडगेवार यांनी सन 1925 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघ 100 वर्षाचा झाला असे म्हणताना केवळ दिवस किंवा वर्ष मोजणे हे संघ कार्य नसून राष्ट्रीय कार्य सातत्याने सुरू ठेवणे हे खरे संघ कार्य आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमधून चारित्र्यवान आणि प्रखर राष्ट्रभिमानी नागरिक घडतात असे मौलिक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहकार्यवाहक अजय नवघरे यांनी केले.ते कामठी येथील मोदी पडावं ,राम मंदिर जवळील संघ मैदानात 12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कामठी द्वारा आयोजित श्री विजयादशमी उत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
याप्रसंगी व्यसपीठावर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रामदेव बाबा सेवा समिती कामठी चे अध्यक्ष परम पूज्य बापजी तेजराम जैन ,नगर संघचालक मुकेश चकोले,नगर कार्यवाह मयूर जलवानिया उपस्थित होते.ते पुढे म्हणाले डॉ हेडगेवारांनी वैद्यकीय व्यवसाय न करता राष्ट्रनिर्माण करण्यासाठी हिंदूंचे संघटन करण्याचा निर्णय घेतला. बोटावर मोजण्या इतक्या लहान मुलांना घेऊन त्यांची संघाची सुरुवात केली.आज या संघटनेचा वटवृक्ष झाला असून देशाची दशा व दिशा बदललेली आहे.
याप्रसंगी त्यांनी कुटुंब, प्रबोधन, स्वदेशी,सामाजिक समरसता,पर्यावरण रक्षण आणि नागरिक कर्तव्य या पंचसूत्री बाबत समाजाला सचेत करण्याचे आवाहन केले.तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण प्रार्थना झाली.स्वयंसेवकांनी व्यायाम योग, नियुद्ध योग,प्रात्यक्षिके सादर केली. तत्पुर्वी संपूर्ण कामठी शहरातून संपूर्ण गणवेशात शिस्तबद्ध पथसंचालन निघाले होते. प्रास्ताविक,पाहुण्यांचा परिचय व आभार नगर संघचालक मुकेश चकोले यांनी केले .



