Home Latest News माजी खासदार कंकर मुंजारे यांच्या वक्तव्याविरोधात पवार समाज कृती समितीचे केंद्रीय गृहमंत्रालयाला...

माजी खासदार कंकर मुंजारे यांच्या वक्तव्याविरोधात पवार समाज कृती समितीचे केंद्रीय गृहमंत्रालयाला निवेदन

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>पवार समाज कृती समिती &lpar;नागपूर शहर व नागपूर ग्रामीण&rpar; यांनी पूर्व खासदार तथा माजी आमदार कंकर मुंजारे यांनी चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कारवाईची मागणी केली आहे&period; यासंदर्भात समितीने भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयातील अतिरिक्त सचिवांना निवेदन पाठविले&period; त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की&comma; मध्यप्रदेशातील बालाघाट येथे एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान कंकर मुंजारे यांनी सम्राट राजा भोज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे पुलाला त्यांचे नाव देण्यास विरोध दर्शविताना कथितरीत्या आक्षेपार्ह वक्तव्य केले&period;या वक्तव्यामुळे राजा भोज यांना आदर्श मानणाऱ्या समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप समितीने केला आहे&period; पवार समाज कृती समितीने निवेदनात म्हटले की&comma; चक्रवर्ती सम्राट राजा भोज हे भारतीय इतिहासातील महान शासकांपैकी एक असून त्यांच्या प्रशासन&comma; संस्कृती&comma; शिक्षण आणि सामाजिक कार्याचा गौरव इतिहासात आढळतो&period; देशातील विविध समाजघटक त्यांना आदराचे स्थान देतात&period; त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणाऱ्या वक्तव्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे&period; समितीने संबंधित प्रकरणाची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून वक्तव्य तथ्यहीन अथवा कायद्याच्या विरोधात आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे&period; तसेच माजी खासदार म्हणून मिळणाऱ्या शासकीय सुविधा&comma; मानधन किंवा इतर लाभांचीही नियमांनुसार समीक्षा करण्यात यावी&comma; अशी मागणी निवेदनात केली आहे&period; निवेदनात भारतीय न्याय संहिता &lpar;BNS&rpar; 2023 मधील कलम 196 तसेच कलम 299 आणि 302 यांचा संदर्भ देत सामाजिक वैमनस्य किंवा धार्मिक- सामाजिक भावना दुखावण्यासंबंधीच्या तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे&period; प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी&period; या निवेदनावर पवार समाज कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज रहांगडाले यांच्या स्वाक्षरीसह पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असून त्याच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री&comma; मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री&comma; मध्यप्रदेशचे गृहमंत्री&comma; बालाघाट जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत असे प्रसिद्धी पत्रकारद्वारे विजय पटले यांनी कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version