spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पंचनामे करून नुकसान भरपाई द्या ; माजी आमदार रेड्डी

सचिन चौरसिया रामटेक ११ :- तालुक्यात मागील ६ जुलैपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रामटेक, पारशिवनी, देवलापार येथील रस्ते, नदीनाले, शेतशिवार, तलाव, घरे जलमय झाले आहे. सततच्या पावसामुळे घर कोसळण्याची घटना सुद्धा घडल्या आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घटना घडली नाही. नदीनाले ओसंडून भरून वाहत असून पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शेत शिवार जलमय झाले. सोयाबीन, तुर, पराठी पीक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी पुलावरून वाहत असून गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे. अतिपावसामुळे रस्ते, पूल वाहून गेले. मानवी जीवनांचे हाल-बेहाल होत आहे.  प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नागरिकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. असे निवेदन उपविभागीय अधिकारी रामटेक यांना देण्यात आले. त्यावेळी मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र तसेच दिलीप देशमुख माजी नगराध्यक्ष, रजत गजभिये शहर अध्यक्ष भाजपा रामटेक, विवेक तोतडे, संजय बिसमोगरे, प्रशांत किंमतकर, करीम मलाधारी, रामा अडामे, सागर लोंढे, शुभम बीसमोगरे, अनुप राजूरकर, उमाकांत पोफळी, प्रभाकर खेडकर, सुनील गयेगये, ईश्वर बेसिन, सुरेश मोहरे, तिमाझी मेंगरे, महेंद्र दिवटे, इत्यादी सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच नगरपरिषद रामटेक पार्किंगची वसुली रद्द करण्याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.