spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर विमानतळावर शस्त्रासह व्यक्तीला अटक; राजकीय पक्षाच्या नेत्याचा समावेश

 

नागपूर, २६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मोठ्या सुरक्षा त्रुटीमुळे खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीला आपल्या सामानामध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन जाताना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अनिल श्रीकृष्ण पोराड असे आहे. तो यवतमाळ येथील एका राजकीय पक्षाच्या आदिवासी सेलचा अध्यक्ष असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पोराड दिल्लीला जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला होता. त्याच्या सामानाची तपासणी करत असताना, सीआयएसएफच्या जवानांना एका संशयास्पद वस्तू दिसली. जेव्हा त्यांनी बॅग उघडली, तेव्हा त्यांना आतमध्ये एक गावठी कट्टा (पिस्तूल) आणि दोन जिवंत काडतुसे सापडली.

विमानतळ अधिकाऱ्यांनी तात्काळ सोनेगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पोराडची चौकशी केली असता, तो शस्त्र बाळगण्याचे कोणतेही समाधानकारक कारण देऊ शकला नाही. त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेऊन आर्म्स ॲक्टच्या कलमांखाली अटक करण्यात आली.

पोराडचा हेतू काय होता आणि कडक सुरक्षा नियमांनंतरही त्याने हे शस्त्र विमानतळापर्यंत कसे आणले, याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Popular Articles