नागपूर :- जुन्या पिढीतील पत्रकार समाजसेवक आणि झुंजार कार्यकर्ते स्व. उमेश बाबू चौबे यांच्या छायाचित्राचे नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या टिळक पत्रकार भावनात समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले. उमेश बाबूंच्या ९५ व्या, जयंतीदिनी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक पत्रकार भवन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र होते. मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर दुपारे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरीश देशमुख प्रमुख पाहुणे होते. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच समाजातील वाईट चालीरीतींच्या विरुद्ध उमेश बाबू सतत संघर्षरत राहायचे. असा गौरवपूर्ण उल्लेख करीत तीनही वक्त्यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुपम सोनी यांनी सरते शेवटी आभार मानले. या कार्यक्रमाला उमेश बाबूंचे कुटुंबीय, चाहते, सहकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. याप्रसंगी नीरज चौबे, तनुज चौबे, विजय कदम, ज्ञानेश्वर गुरव, विक्रांत मोहरे, नरेश निमजे, राजेश कुंभलकर, नितीन रोंघे, दिलीप नरवडीया, राम शिवणकर, केशवराव मधुमटके, निखिल भुते, राजू पिंपळकर, नंदू लेकुरवाळे, गोल्डी शेख, मुकुंद मुळे, आणि योगिता शेंडे ह्या उपस्थित होत्या.








