spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा तालुक्यात गुलाबी थंडीचे आगमन

किशोर साहू, मौदा, ता. १३:- मौदा तालुक्यातील गावां- गावांमध्ये पहाटेला नागरिक घरून बाहेर पडताना अंगात स्वेटर तर कानाला दुपट्टा बांधून बाहेर पडताना दिसत आहेत. तर कुठे कुठे थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी शेकोट्याही पेटवताना दिसत आहे. यावरून तालुक्यात गुलाबी थंडीचे आगमन झाल्याचे दिसून येते.

रविवार दिनांक 12 ऑक्टोबरला मौदा बस स्थानकात वृत्तपत्र वितरणा संबंधी काम करणारे कोराड येथील गणेश शिंगणे, मौदा येथील सागर जर्वेकर, संदेश मेश्राम, हर्ष निनावे , कोदामेंढी येथील किशोर साहू पहाटेला वृत्तपत्राची पार्सल घेऊन येणारी गाडी येण्यापूर्वी थंडीपासून उब मिळावी म्हणून शेकोटी पेटविण्याच्या यंदाच्या गुलाबी थंडीचा श्रीगणेशा केला.

Popular Articles