spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्त्री शक्तीचा सन्मानासाठी “पिंक मॅरेथॉन” 8 मार्च रोजी

– स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे

– पिंक मॅराथॉन मध्ये मोठ्या संख्येत सहभागी व्हा: मनपाचे आवाहन

 नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारा स्त्री शक्तीचा जागर आणि स्त्रीत्वाच्या सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त रविवार 8 मार्च रोजी “पिंक मॅराथॉन” चे आयोजन धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारा केले जात आहे. मनपातर्फे स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी, आरोग्य, आत्मविश्वास आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारी ही विशेष ‘पिंक मॅराथॉन’ महिलांसाठी समर्पित आहे. मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात 8 मार्च रोजी पिंक मॅराथॉन आयोजित करण्यात आली आहे.

“पिंक मॅराथॉन” स्पर्धा तीन गटात होणार असून, १६ वर्षांखालील महिलांसाठी ३ किमी, सर्वसामान्य गटासाठी ५ किमी व विशेष पिंक रन ही २ किलोमीटर अंतराची असणार आहे. सर्वसामान्य गटासाठी आयोजित करण्यात येत असलेली ५ किमी ची मॅराथॉन ही यशवंत स्टेडियम-महाराष्ट्र बँक चौक-झांसी राणी चौक-विद्यापीठ लायब्ररी चौक-अलंकार टॉकीज चौक- कच्छीपुरा चौक-दीक्षाभूमी अण्णाभाऊ साठे चौक-रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन चौक-रहाटे कॉलनी गोरक्षण सभा चौक-होमगार्ड ऑफिस–धंतोली उद्यान-मेहाडिया चौक येथे पोहचेल तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल.

तसेच १६ वर्षांखालील महिलांसाठी आयोजित करण्यात येत असलेली ३ किमी ची मॅराथॉनची सुरुवात यशवंत स्टेडियम येथून होणार असून पुढे महाराष्ट्र बँक चौक- झांसी राणी चौक- विद्यापीठ लायब्ररी चौक- कल्पना बिल्डिंग- लोकमत चौक – धंतोली उद्यान- मेहाडिया चौक येथे पोहचले तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त समाप्त होईल. विशेष पिंक रन ही २ किलोमीटर मार्ग यशवंत स्टेडियम- पंचशील चौक-विद्यापीठ लायब्ररी-कल्पना बिल्डिंग-लोकमत चौक-पंचशील चौक येथे पोहचेल तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. स्पर्धेची नोंदणी https://nmc-pink-run-form.emergent.host/ या गुगल लिंक वर करावयाची असून, लिंक म.न.पा. च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच नोंदणीकृत स्पर्धकांनी टी-शर्ट व चेस नंबर ७ मार्च रोजी यशवंत स्टेडियम येथुन दुपारी 4 ते 7 या वेळेत प्राप्त करून देण्यात येणार आहे. पिंक मॅराथॉन मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले.

Popular Articles