spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुलाबी थंडीची चाहूल; ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या

– शेकोट्यांजवळ रंगत आहे गप्पांचा फड

गोंदिया :- जिल्ह्यात थंडी चाहूल लागताच जिल्हावासीयांना . थंडीची हूड हूड भरली आहे.नोव्हेंबर महिना सूरू होताच अनेक भागांमध्ये थंडीची हुळहुळी वाढायला सुरुवात झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आता थंडीच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी ‘शेकोटी’ हाच एकमेव आणि हक्काचा आधार ठरत आहे.

या शेकोटीभोवती गावकरी, वृद्ध, तरुण आणि लहान मुले एकत्र जमतात. येथे गावातील राजकारण, शेतीच्या समस्या, नुकतीच झालेली कामे, आणि व्यक्तिगत सुख-दुःखाच्या गप्पांचा फड रंगतो. थंडीमुळे घरात बसण्यापेक्षा, मोकळ्या वातावरणात शेकोटीच्या उबदार प्रकाशात एकमेकांना समजून घेण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

अचानक थंडी वाढल्याने स्वेटर जॅकेट उबदार कपड्यांची सुध्दा आता मागणी वाढल्याशिवाय राहणार नाही. अचानक थंडी चाहूल लागल्याने नागरीकांनी सुध्दा उबदार कपडे कपाटातील बाहेर काढावे लागल्याचे चित्र जणु दिसून येत आहे.

Popular Articles