spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पियुष बुरडे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर, अध्यक्ष पदाचे दावेदार नाराज, नाराज कार्यकर्ते शिवसेना (शिंदे) व काँग्रेसच्या संपर्कात

खापा :- खापा नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग वाजले असले तरी, राजकीय मैदान मात्र अद्यापही शांत होते. मात्र (दि. १४) शुक्रवाराला भाजप हायकमांडने एकमताने खापा नगराध्यक्षपदासाठी भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण (काटोल) पियुष बुरडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. इतर दावेदारांनी बुरडे यांच्या निवडीला तीव्र विरोध केला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप शहराध्यक्ष रवींद्र खुबाळकर यांनी आपल्या कार्यकारणीसह राजीनामा दिला. दावेदार उमेदवार आणि नाराज कार्यकर्ते शिवसेना (शिंदे गट) व काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. नाराज उमेदवार आणि कार्यकर्ते बुरडे यांना किती पाठिंबा देतात हे पाहण्याजोगे आहे.

निवड प्रक्रियेदरम्यान क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख, जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, राजीव पोद्दार, श्रीकांत देशपांडे, देविदास मदनकर, रामराव मोवाडे, सुरेंद्र शेंडे यांच्या सह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नेतेमंडळी उपस्थित होते.

“नाराज दावेदारांचा काँग्रेस, सेनेकडे मोर्चा”

नाराज दावेदार तसेच काही कार्यकर्ते शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली असून, पुढील राजकीय हालचाली खापा येथे नवे समीकरण निर्माण करण्याची शक्यता आहे. बुरडे यांच्या उमेदवारीला स्थानिक कार्यकर्त्यांकडून किती पाठिंबा मिळतो आणि नाराज गटाचे पुढील पाऊल काय असेल, यावर खापा येथील राजकीय वातावरणाचे तापमान ठरणार आहे. आंतरकलह, संभाव्य बंडखोरी आणि नव्या जोडगोळ्यांच्या चर्चांनी सध्या स्थानिक राजकारण अधिक तापले आहे.

“कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापले”

दरम्यान, स्थानिक राजकारणातील गुप्त हालचाली, आंतरकलह आणि संभाव्य बंडखोरीच्या चर्चांनी सध्या वातावरण तापले आहे. पुढील काही दिवसांत या तापलेल्या वातावरणात कडाक्याच्या थंडीत रणांगणात कोण रंगत आणणार, याकडे खापावासियांचे लक्ष लागले आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अजुनही दोन दिवस शिल्लक आहे. अश्यात पक्षश्रेष्ठी कोणते ठोस निर्णय घेत सुरु झालेल्या बंडखोरीला शमवतात याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.