Thursday, February 19, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पर्यटन स्थळाची माहिती मिळविण्यासाठी पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळेने केले शैक्षणिक सहलीचे आयोजन 

किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव ची शैक्षणिक सत्र 2025 – 26 या सत्रातील शैक्षणिक सहल नवेगावबांध, इटीयाडोह, येथे आयोजित केलेली होती. पीएम श्री शाळा या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध पर्यटन स्थळाची माहिती मिळावी या उद्देशातून तसेच विविध भौगोलिक परिस्थितीची जाणीव व्हावी, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी, शैक्षणिक सहली चे आयोजन करण्यात आले.

या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी सुरुवातीला पीएम श्री जिल्हा परिषद दहेगाव येथून प्रस्थान केल्यानंतर दिघोरी मोठी येथे पुराणकालीन जागृत हनुमंताचे मंदिर येथे दर्शन घेतले. त्यानंतर इटियाडोह येथे विद्यार्थ्यांना नेण्यात आले. इटियाडोह येथे विद्यार्थ्यांनी सभोवतालचे निसर्गरम्य वातावरण बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. इटियाडोह धरण हे गाढवी नदीवर बांधण्यात आलेला आहे. इटियाडोह धरणामध्ये मासेमारी सुद्धा करण्यात येते. या धरणाकडे बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना नदीवर कशाप्रकारे धरण बांधले जाते याची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आली. इटियाडोह धरण बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना नवेगाव बांध येथील परिसर दाखविण्यात आले.नवेगावबांध येथे विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी नवेगाव बांध परिसरातील तलावाचे , परिसरातील झाडांचे,पशु पक्ष्यांचे मुलांनी निरिक्षण करण्यात केले . मुलांसाठी असणाऱ्या विविध खेळांच्या साहित्यांचा मुलांनी आस्वाद घेतला. मुलांनी विविध झुल्यावर ,विविध खेळांच्या साहित्याचा मनसोक्तपणे आस्वाद घेण्यात आला विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीच्या निमित्तातून जो आनंद निर्माण झाला तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणि चिरकाल स्मरणात राहील असा त्यांचा अनुभव होता. नवेगाव बांध नंतर विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध दाखविण्यात आले . विद्यार्थ्यांना नवेगाव बांध येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील परिसर तसेच विद्यार्थी कसे या ठिकाणी राहतात आणि या ठिकाणी प्रवेश कसे मिळते याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुद्धा जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध येथील सर्व बाबींचे निरीक्षण केले आणि विद्यार्थ्या सोबत संवाद साधला. पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथील विद्यार्थ्यांमध्ये आपण सुद्धा जवाहर नवोदय विद्यालय येथे प्रवेश मिळवु शकतो ही भावना सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध येथे वर्ग 5 व्या वर्गापासून वर्ग 12 व्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते या सर्व बाबी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले .

शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक वासुदेव भुते, धानला केंद्राचे केंद्रप्रमुख राजू आंबिंलकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके, शाळेतील शिक्षक लिलाधर काळबांडे ,सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे ,राजेश रोहाड, सुजाता बोदेले ,प्रज्ञा रामटेके, संगीता आंबीलढुके, उमेश उके,पुष्पलता उके, कैलास फटिंग यांनी परिश्रम घेतले. या शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी आणि शैक्षणिक वातावरण वाढवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे हे विशेष!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com