spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आज ‘सांज शब्दांची’ काव्य मैफिल

– मराठी भाषा सवंर्धन पंधरवड्यातील विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण

– विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे आयोजन

नागपूर :- मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता नियोजन भवन येथे ‘सांज शब्दांची’ या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण यावेळी होणार आहे.

मराठी भाषा गौरवदिन कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते होणार असून अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अपर आयुक्त महसूल राजेश खवले, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार, सहायक आयुक्त रोहयो अविनाश हदगल, सहायक आयुक्त तथा मराठी भाषा अधिकारी शिल्पा सोनाले, सहायक भाषा संचालक संतोष गोसावी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे उपस्थित राहणार आहे.

‘सांज शब्दांची’ काव्यवाचन कार्यक्रमात कवी व व्याख्याते प्रताप वाघमारे, हास्य कवी नितीन वरणकार, गझलकार गोपाल मापारी आणि संजय कावरे सहभागी होणार आहेत.

मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी निबंध लेखन, चारोळी/घोषवाक्य, शब्दकोडे आणि कविता वाचन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधे विविध शासकीय विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.

Popular Articles