spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची रामधामला सदिच्छा भेट

– रामधामची सामाजिक आणि पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

सचिन चौरसिया, रामटेक :- महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी तथा नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मंगळवार (दि. १०) रोजी रामटेक येथील प्रख्यात गडमंदिर येथे प्रभू श्रीरामाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर मनसर येथील जगप्रसिद्ध रामधाम तीर्थला सदिच्छा भेट दिली. रामधामचे संस्थापक तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, संध्या चौकसे आणि मुलगा गौरव चौकसे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीदरम्यान त्यांनी रामधाममधील धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली. रामधाममध्ये आतापर्यंत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात १४१७ जोडप्यांचे विवाहगाठ बांधली गेली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील वधू-वरांसाठीच्या मोफत सोहळ्याबाबत चौकसे कुटुंबीयांचे कौतुक केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद जगप्रसिद्ध ३५० फूट लांबीची ओम प्रतिकृती, जलपरी शो, लाईट हाऊस वॉटर पार्क, फिश अक्वेरियम, अम्युझमेंट पार्क आणि सुवी बर्ड पार्कला भेट दिली. रामधामच्या पर्यटन सुविधांची पाहणी केली. पर्यटन विकासासोबत सामाजिक बांधिलकी जपणारे चंद्रपाल चौकसे यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले.

Popular Articles