spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खरबी शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ९ जणांविरुद्ध गुन्हा, ४.४४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

हंसराज,प्रतिनिधी भंडारा जवाहरनगर :- पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा खरबी येथील घाटोळे यांच्या शेतालगत असलेल्या पांदन रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ७ आरोपींना रंगेहात पकडले असून, दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि पाच दुचाकींसह एकूण ४ लाख ४४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा यांना गुप्त माहिती मिळाली होती की, खरबी शिवारात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून अधिन मनसजन थोटे (२६, रा. खरबी), मनिष गुलाब गौरखेडे (२८, रा. खराडी), स्वरूप हर्षल मेश्राम (३०, रा. खरबी), रोहित प्रभाकर लांडे (२६, रा. महादुला), आकाश श्रीधर बावनकर (२८, रा. मौदा), पंढरी नामदेव हटवार (४५, रा. खरबी) आणि पांडुरंग गोपीचंद आकरे (३७, रा. खरबी) यांना ताब्यात घेण्यात आले. तर आशिष गिरेपुंजे आणि आकाश पैदाम (दोघेही रा. खरबी) हे पोलीस येताच फरार झाले.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जुगाराच्या फडावरून आणि आरोपींच्या अंगझडतीतून १,९८० रुपये रोख, ५२ ताश पत्ते, १० हजार रुपये किमतीचे सहा अँड्रॉइड मोबाईल फोन जप्त केले. याशिवाय आरोपींच्या ताब्यातील एक होंडा शाईन (MH 40 CR 3128), दोन होंडा स्प्लेंडर (MH 40 BQ 5079 व MH 36 AK 9726), एक सीबीझेड (MH 36 R 8902) आणि एक विना क्रमांकाची टीव्हीएस कंपनीची दुचाकी असा एकूण ४,४४,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११८/२०२६ नुसार कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा व त्यांच्या पथकाने केली. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles