Home Latest News कुसळ अंगणवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; १० आरोपी ताब्यात

कुसळ अंगणवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; १० आरोपी ताब्यात

0
75

 

सुरज बंडीवार: पांढरकवडा-१३ : कुसळ येथील अंगणवाडी सार्वजनिक इमारतीत सुरू असलेल्या तीनपत्ती जुगारावर पोलिसांनी कारवाई करत १० जणांना रंगेहाथ पकडले असून, एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या कारवाईत एकूण ८४,९५०/- किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी पांढरकवडा पोलीस ठाण्यातील अधिकारी ड्युटीवर असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की मौजा कुसळ येथील अंगणवाडीच्या इमारतीत काही इसम ५२ पत्त्यांवर तीनपत्तीचा जुगार खेळत आहेत. पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली. धाडीत पोलिसांना १० इसम जुगार खेळताना आढळले, तर एक जण पोलिसांना पाहून पळून गेला. या कारवाईदरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आले. यात ४,९५०/- रोख रक्कम, ११ मोबाईल फोन, २ मोटारसायकल/ मोपेड वाहने आणि ५२ पत्त्यांचे गट्ठे. जुगारासाठी सार्वजनिक ठिकाण, म्हणजेच अंगणवाडीची इमारत वापरण्यात आल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ अंतर्गत गुन्हा नोंदवला. सदरची कारवाई पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल कावरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद घोटेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय राठोड यांनी केली